
स्थैर्य, सातारा, दि.१४: शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सातारा शहरातील मोळाचाओढा, बसस्टॅड भुविकास चौक परिसरात अवैध धंद्यांवर छापे टाकून 7 जणांवर गुन्हे दाखल केले तर 6 हजार 694 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत माहिती अशी, शहरातील मोळाचाओढा ते आझाद बेकरी जाणारे रोडवर पटांगणातील ट्रकचे आडोशास दुपारी शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी निलेश गुलाबराव शिंदे वय 39 वर्ष रा. शनिवारपेठ सातारा, अनिल लक्ष्मण वाघमारे वय 36 वर्ष रा. 702 गुरुवारपेठ सातारा हे मटका व्यवसायिक, नितीन अनिल कुर्हाड रा. करंजे सातारा व मनोज बक्कु मिठापुर रा. मोळाचाओढा सातारा यांच्याकरिता कल्याण मटका नावाचा जुगार चालवत असल्याचे आढळले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून 1 हजार 434 रुपये रोख, जुगाराची साधने असा मुद्देमाल हस्तगत केला.
त्यानंतर भुविकास बँक चौकाजवळील स्टेडीयमचे समोरील पटांगणातील लक्झरी वाहनांच्या आडोशास सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी विश्वास लक्ष्मण पवार वय 41 रा. कामठी, ता.जि.सातारा, मोहम्मद लतीफ सय्यद वय 33 रा .501 शनिवारपेठ सातारा हे स्वतःचे व मटका व्यवसायिक यासिन इक्बाल शेख रा. गुरुवार परज सातारा याच्या आर्थिक फायद्याकरीता कल्याण मटका नावाचा जुगार चालवत होते. त्यांच्याकडून 5 हजार 260 रुपये, मोबाईल हॅन्डसेट व जुगाराची साधने असा मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहूुपरी पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास छापे टाकुन कारवाई करणेच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे सपोनि श्री विशाल वायकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.हेड.कॉ.हसन तडवी, पो.ना. लैलेश फडतरे, अमित माने, ओंकार यादव यांचे पथकाने मटका अड्डयावर छापे टाकुन पुढीलप्रमाणे कारवाई केलेली आहे.