बौद्धजन सहकारी संघाची काँसिल सभा मोठ्या उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑगस्ट २०२२ । मुंबई । बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी, गाव-मुंबई, मध्यवर्ती, विश्वस्त, विभाग अधिकारी आणि उपसमितींच्या सर्व कार्यकारिणी यांची संयुक्त काँसिल सभा आयु. दीपक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली परळ मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

सदर बैठकीत गाव तालुक्याचे अध्यक्ष सुनील जाधव, कार्याध्यक्ष विश्वनाथ कदम, सरचिटणीस महेंद्र मोहिते आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ पवार, सरचिटणीस संजयजी तांबे, उपकार्याध्यक्ष प्रभाकर पवार, प्रमुख विश्वस्त संजय पवार, विश्वस्त राजाभाऊ गमरे, विश्वस्त के.सी.जाधव, न्यायदान कमिटी अध्यक्ष शशिकांत मोहिते, शिक्षण समिती अध्यक्ष जितीन नागे, संस्कार समिती अध्यक्ष संदीप गमरे, संघाचे ऑडिटर संदेश गमरे त्यांचे सहकारी, गाव-मुंबईची मध्यवर्ती कार्यकारिणी आणि सर्व विभाग अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, सदर बैठकीत संघाची घटना दुरुस्ती, बौद्धजन सहकारी संघ पतसंस्था उभारणीची पूर्वतयारी, निवडणूक, विधवा प्रथा बंदी तसेच तालुक्यातील इतर लहान-सहान प्रश्न आणि संघाच्या हिताच्या अनेक विषयांवर आणि संघाच्या पुढील वाटचालीवर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चर्चा झाली, सदर चर्चेत सर्वच प्रस्ताव एकमेकांच्या सामंजस्याने योग्यरीत्या मांडून सर्वांनुमते त्यावर निर्णय घेण्यात आले त्यामुळे मतभेद व मतभेद न होता खेळीमेळीच्या वातावरणात सदर काँसिल पार पडली.

पुढील बैठक ९ ऑक्टोबरला गावी आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सर्वात शेवटी संजयजी पवार व महेंद्र मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


Back to top button
Don`t copy text!