
स्थैर्य, वाई, दि.२८ : मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने वाई शहरात येण्यास मनाई करत जामीन दिलेला गुन्हेगार सागर भाऊराव मेश्राम (रा. गंगापूरी वाई) हा वाई शहरात आला होता.याला पकडून चौकशी कामी पोलीस ठाण्यात आणले असता त्याने पोलीस निरीक्षकांच्या टेबलवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सागर भाऊराव मेश्राम (रा. गंगापूरी वाई) हा गुन्हेगाराला पोलिसांनी पकडून त्याच्यावर एक महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल केला होता.जिल्हा सत्र न्यायालय सातारा यांनी वाई शहरात येणेस बंदी घालत मनाई आदेश करुन जामिन मंजूर केलेला आरोपी सागर भाऊराव मेश्राम (रा. गंगापूरी वाई ता. वाई जि. सातारा हा वाईमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.वाई पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेशन जवान श्रावण राठोड व होमगार्ड प्रणित येवले यांना गस्त घालत असताना दुपारी गंगापुरी येथे फिरताना आढळून आला. त्यावरून सागरला त्यांनी विचारले असता तो त्यांच्यावरच दादागिरी करू लागला. तुम्हाला काय कराचेय कोर्ट व मी बघून घेईन’ असे म्हणाला. त्यावरून त्याला वाई पोलीस ठाण्यात आणला. पोलीस निरीक्षक खोबरे यांच्या कक्षामध्ये त्यास विचारपूस करण्यास हजर केले असता त्याने गोंधळ घालत स्वतःचे डोके टेबलावर आपटले. त्याने अचानक घेतलेल्या पवित्र्याने उपस्थितांची पळापळ झाली. परंतु लगेच पोलिसांनी त्यास पकडले. त्याच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे तपास करत आहेत.