लर्निग फ्रॉम होम ही संकल्पना सध्याच्या काळाशी सुसंगत ठरणारी


स्थैर्य, सातारा, दि. 12 : लर्निग फ्रॉम होम ही संकल्पना काहीशी वेगळी वाटत असली तरी सध्याच्या काळाशी सुसंगत ठरणारी आहे. अशा संकल्पना तितक्याच सहजसोप्या, सहजशक्य आहेत.अर्यात त्यासाठी स्मार्ट फोन, टॅबसारख्या साधनांची आवश्यकता आहे,यासाठी   दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था व कंपन्या यांनी पुुढाकार  घेण्याचे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.

कोरोनाने साऱ्या जगाचे चित्र बदलून टाकले आहे.रावापासून रंकापर्यंत, खेडयापासून शहरापर्यत, देशापासून जगापर्यंत कुणीही या तडाख्यातून सुटलेले नाही. जीवनाच्या सर्वच क्षेत्राला त्याचा फटका बसला आहे. शिक्षणाचे क्षेत्रदेखील त्याला अपवाद नाही.विदयार्थी, पालक, समाज या साऱ्यांसाठीच शिक्षण ह्य अगत्याचा, आत्मियतेचा विषय आहे. शिक्षण हेविदयार्थ्यासाठी असले, तरी पालकांची भूमिका त्यात कायमच महत्त्वाची असते. समाजाचाही त्यात उल्लेखनीय सहभाग असतो.किंबहुना समाजसहभागाविना शिक्षणाचा रथ पुढे जाऊ शकत नाही.कोरोनाजन्य परिस्थितीमुळे सध्या शिक्षण क्षेत्रापुढे नाना समस्या उभ्या ठाकल्या आहेत.

शाळा सुरू करण्याबाबत राज्यभर विचारमंथन सुरू आहे. याबाबत शासन आदेशाची प्रतिक्षा आहे. सद्यस्थितीत दोन सत्रांमध्येकिंवा दिवसाआड शाळा भरवणे, दूरचित्रवाणी व आकाशवाणी पाठ सुरू करणे अथवा बच्र्युअल पध्दतीने शाळा सुरू करणे असे अनेक पर्याय पुढे येत आहेत.या स्थितीत विदयार्थ्या शिक्षणाच्या परिघात राहणे हे महत्वाचे आहे.स्मार्टफोन हे बहुउपयोगी साधन असून ते शेक्षणिक साधन म्हणूनही त्याचा चांगला उपयोग करता येऊ शकतो.

स्मार्टफोन/टेंबच्दारे हर्चुअल शिक्षण हा एक सर्वोत्तम नसला तरी एक चांगला पर्याय आहे.लर्निग फ्रॉम होम ही संकल्पना काहीशी वेगळी वाटत असली तरी सध्याच्या काळाशी सुसंगत ठरणारी आहे. अशा संकल्पना तितक्याच सहजसोप्या , सहजशक्य आहेत.अर्यात त्यासाठी स्मार्ट फोन, टॅबसारख्या साधनांची आवश्यकता आहे.सातारा जिल्हयाचा विचार करता, जिल्लयात एकुण ८१४ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत, त्यात ५५४ अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांचा समावेश आहे. उर्वरित शाळा या इंग्रजी माध्यम किया स्वयंअर्थसहाय्यीत आहेत. यातील बहुतेक शाहा ग्रामीण भागात आहेत.या शाळामधून सुमारे तीन लाख पंचवीस हजार इतके विदयार्थी शिक्षण घेतात.शाळांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, सुमारे ३२ टक्के पालकांकडे लर्निंग फ्रॉम होम या उपक्रमासाठीआवश्यक असलेले स्मार्ट फोन व टंच उपलब्ध नाहीत. लर्निंग फ्रॉम होम पर्याय वापरावा लागल्यास काही विध्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर , समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभायो सामाजिक संस्था किंवा विविध औदयोगिक संस्थावर महत्त्वपूर्ण जबाबदारी येऊन ठेपली आहे. त्यांनी पुढाकार घेऊन गरजू गरीब होतकरू विदयाथ्यांना स्मार्ट फोन, टैब उपलब्ध करुन दिले तर वंचितांच्या शिक्षणाला गती लाभणार आहे. प्रगतीचे एक पाऊल आणखी पुढे पडणार आहे. शिक्षणासाठी धावणाऱ्या पावलांत आणखी बळ येणार आहे.अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. आता त्या जोडीला आरोग्य व शिक्षणहीतितकेच महत्वाचे आहे.मलभूत गरजांची पूर्तता करण्याची ज्यांना भ्रांत आहे, ते स्मार्ट फोन किंवा टॅब कोठून आणणार? आणि त्यासाठी लागणारा नेटकही कसा उपलब्ध करणार? त्यामुळे विद्याथ्यांची , पर्वावाने समाजाची गरज ओळखून आपण पुढे यावे ही विनंती आहे. कंपन्यांनी कॉरेिट सोशल रिस्पॉन्सिथिलीटी सी.एस.आर.(उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व) च्या माध्यमातून शाळांना अनेकदा सहकार्य केलेले आहे. चालू वर्षों सी.एस.आर. मधून विद्यार्थ्यांसाठी अन्य साहित्यसाधने न देता स्मार्ट फोन किंवा व शाळांना देऊ शकाला, याबाबत कंपन्यांनी जरूर विचार कराया.शाळा ते स्मार्ट फोन/टॅब बंचेसच्या स्वरुपात सर्व विद्याथ्यांसाठी वापरू शकतील.कोरोना प्राभाव काळात तसेच त्या पुढील कालावधीतही स्मार्ट फोन/टेब विद्याथ्यांसाठी उपयोगी पडतील.

आजवर आपण आपली भूमिका आत्मियतेने पार पाडली आहेच, सध्याच्या कसोटीच्या काळात आपण विद्यार्थ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहाल, हा विश्वास वाटतो. या व्दारे आपणास विनय आवाहन करण्यात येते,की आपल्या परिसरातील गरजू, गरीब, होतकरू विदयाथ्यांसाठी आपण मदतीचा हात पुढे करावा, याबाबत ज्यांना शाळांसाठी मदत करावयाची आहे, त्यांना थेट संबंधित शाळेशी संपर्क साधावा.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!