संतांची संगत, संतांचे वाङ्मय हेच आपल्या जीवनाचे दिशादर्शक – मकरंद बुवा रामदासी


सज्जनगड – येथील कीर्तन सादर करताना समर्थ भक्त मकरंद बुवा रामदासी. (छाया-अतुल देशपांडे, सातारा)
स्थैर्य, 10 फेब्रुवारी, सातारा : आम्ही रामाचे, रामाचे … या समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या अभंगावर सुप्रसिद्ध कीर्तनकार मकरंद बुवा रामदासी यांनी अतिशय सुरेख कीर्तन रंगवले .औचित्य होते सज्जनगड येथे श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या अंतर्गत कीर्तन सोहळ्याचे आपल्या कीर्तनाची सुरुवात नेहमीप्रमाणेच मकरंद बुवा यांनी समर्थांच्या अभंगांनी घेत भक्तनिवासात दोन तास उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले.

आजच्या वैज्ञानिक काळात उपभोगाची अनेक साधने उपलब्ध आहेत. समाज अध्यात्मापासून दूर चालला आहे. पण जीवनात हित घडावे असे वाटत असेल तर, सत्संगती ,संतांचे वाङ्मय हेच आपल्याला दिशा दाखवते. असेच समर्थ या अभंगात म्हणतात. आपण सगळेच रामाचे आहोत.

रामाचे गुण ,रामाचे रूप डोळ्यासमोर सतत ठेवून त्याची नाम सतत घेतली. त्यासाठी काया,वाचा, मन याचा उपयोग केला आणि हे नाम ही भक्ती आणि भावाने घेतले .अगदी जीव ओतून घेतले तर, तो राम आपल्याला जेथे हवे तेथे पोहोचवेल .म्हणजेच देहभावातून आत्मभावापर्यंत आणि आत्मभावातून ब्रह्मभावापर्यंत निश्चित घेऊन जाईल. यासाठीच प्रत्येकाने राम भजला पाहिजे ,राम गायला पाहिजे ,कारण राम हा दीनांचा तारक आहे. असे विचार आपल्या कीर्तनातून अतिशय सुरेखपणे मांडले.

मकरंद बुवा यांना यावेळी साथ संगत त्यांना तबल्यावर साथ अभिनव जोशी यांनी, व्हायोलिनवर उदय गोखले यांनी. पखवाजावर गणेश मेस्त्री यांची साथ होती तर ऑर्गन वादन सुशील गद्रे यांनी केले.या सर्व कलाकारांना अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस यांनी रामनामी शाल ,समर्थ प्रसाद देऊन गौरव केला. यावेळी सर्व कलाकारांची ओळख व त्यांचा परिचय मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी अतिशय सुरेखपणे करून दिली. कार्यक्रमाच्या वेळी संपूर्ण राज्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!