बीएसएनएलच्या समितीने घेतला ग्रामीण भागातील सेवा-सुविधांचा आढावा; तांबवे, निरगुडी गावांना त्रीसदस्यीय समितीची भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
भारत सरकार वरिष्ठ अधिकारी समितीने भारत संचार निगम लि., (इडछङ) मार्फत उद्यमी या पथदर्शी प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागात दिल्या जाणार्‍या सेवा सुविधांचा आढावा घेण्यात आला.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

तांबवे व निरगुडी, ता. फलटण या ग्रामपंचायतींना दूरसंचार विभाग भारत सरकार दिल्ली शुभेंदु गुप्ता, भारत संचार निगम पुणेचे वरिष्ठ अधिकारी विनय जांभळी, संचालक ग्रामीण युवराज वर्मा यांचा समावेश असलेल्या त्रीसदस्यीय समितीने भेट दिली. यावेळी भारत संचार निगम उपमहाप्रबंधक सातारा व्ही. एम. पाटील, सहाय्यक महाप्रबंधक सातारा रियाज पटवेकर आणि दोन्ही गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व नागरिक उपस्थित होते.

सहाय्यक महाप्रबंधक रियाज पटवेकर यांनी उद्यमी या पथदर्शी योजनेची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली. ग्रामीण भागामध्ये हायस्पीड इंटरनेट सेवा अनुदानित किमतीमध्ये उपलब्ध असल्याचे सांगून प्रत्येक ग्राहकाला भारत सरकार ३ हजार रुपयांचे अनुदान या योजनेंतर्गत देत आहे. आपल्या गावी राहून वर्क फ्रॉम होम करणार्‍या ग्रामीण भागातील अनेक तरुणांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचे रियाज पटवेकर यांनी निदर्शनास आणून दिले.

या योजनेच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना होत असून शासनाच्या विविध ऑनलाइन सेवा या माध्यमातून ग्रामस्थ, शेतकरी, छोट्या व्यावसायिकांना घरबसल्या घेता येत असल्याचे सांगत भारत संचार निगम लि. देत असलेल्या सेवेबद्दल सरपंच व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत भारत संचार निगमला धन्यवाद दिले.


Back to top button
Don`t copy text!