फलटण शहरात घाणीचे, दलदलीचे साम्राज्य; स्वछतेसाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 11 ऑक्टोबर 2021 । फलटण । फलटण शहरातील रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालय, पिण्याचे पाणी याची फार मोठी दुरवस्था झाली असून सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. फलटण शहरात घाणीचे, दलदलीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे फलटण शहराची अवस्था फार वाईट झाली असून हे घाणीचे व दलालांचे साम्राज्य हटवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही स्वतः सुरुवात केली आहे आहे यासाठी नागरिकांनीही प्रतिसाद द्यावा असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ बुथ सेवा सप्ताह निमित्त शहर स्वच्छता अभियान या कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील पाचबत्ती चौक येथून केला असून संपुर्ण शहरात औषध फवारणी,गाजर गवत काढणे, पावडर फवारणी, गटर स्वच्छता, रस्ता झाडलोट करणार आहेत.

खासदार रणजीतसिंह म्हणाले, फलटण शहरातील अस्वच्छतेमुळे डासांची निर्मीती होवून डेंग्यू, मलेरिया, गोचीड ताप अशा संसर्गजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असून, त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकाला भोगावे लागत आहे. यासाठी फलटण शहराला स्वच्छ करणे हाच हेतू असून फलटण शहरातील स्वच्छतेचे काम अविरत चालू ठेवणार आहे. शहरातील ज्या भागांमध्ये कचरा निर्माण झाला असेल त्याची माहिती नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला दिल्यास त्याठिकाणी स्वच्छता केली जाईल. नागरिकांनी सुद्धा ओला व सुका कचरा वेगळा करून कोणतेही संसर्गजन्य रोगाचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी व नगरपालिकेने ही राजकारण बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करावे असे अवाहन खासदार रणजीतसिंह यांनी केले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, शहर अध्यक्ष अमोल सस्ते महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सौ उषा राऊत, मुक्ती शहा, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, गटनेते अशोकराव जाधव व नगरसेवक सचिन अहिवळे तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, व फलटण शहरातील भाजपाचे सर्व आघाडीचे पदाधिकारी यांनी सेवा सप्ताहात सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!