दैनिक स्थैर्य | दि. ३१ जुलै २०२३ | फलटण |
फलटण शहरात काही दिवसांपूर्वी चायनीज मांजाने जबर जखमी झालेले दोन तरुण अजून बरे झाले नसतानाच काल चक्क मांजाने पीव्हीसी पाईप कापला. त्या मांजाची दाहकता किती असेल, हे कल्पनेच्या पलीकडे आहे. या मांजांचा ताबडतोब बंदोबस्त पोलिसांनी केला पाहिजे, असे फलटणकरांनी व्यक्त केली आहे.
आळंदी-पंढरपूर मार्गावर स्मशानभूमी फलटण येथे दोन युवक मांजाने जबर जखमी झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज अजिंक्य हाईट्स, स्वामी विवेकानंद नगर, फलटण येथील टेरिसवरील पीव्हीसी पाईप चायनीज मांजाने कापला असून ताबडतोब या चायनीज मांजा विक्रीवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, चायनीज मांजाने जखमी होण्याचे प्रकार वाढले असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने लोकांमधून संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.