
स्थैर्य, सातारा, दि. 30 डिसेंबर : आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी नायगाव येथे भव्य दिव्य स्मारक व्हावे, अशी इच्छा राज्याच्या जनतेची अनेक दिवसांपासून होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर केवळ एकाच वर्षात या स्मारकाचे भूमिपूजन तीन जानेवारीला नायगाव येथे होणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
नायगाव (ता. खंडाळा) येथे 195 व्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमस्थळी पाहणीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटीलपोलिस अधीक्षक तुषार दोशी, सरपंच स्वाती जमदाडे, उपसरपंच गणेशनेवसे, पोलिस उपअधीक्षक विशाल खांबे, प्रांताधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, गटशिक्षण अधिकारी गजानन आडे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनुप सूर्यवंशी, निखिल झगडे, आदेश जमदाडे, अविनाश वाडकर, ऋषिकेश धायगुडे पाटील, अतुल पवार, हर्षवर्धन शेळके- पाटील, बाळासाहेब जाधव, वैभव कांबळे, सागर नेवसे, सोनाली नेवसे, हनुमंत नेवसे, रेश्मा कानडे, साधना नेवसे, सागर नेवसे, पूनम नेवसे, जगन्नाथ नेवसे, सिदुनाना नेवसे, अविनाश वाडकर, प्रकल्प संचालक विश्वास सिद, कार्यकारी अभियंता एम. वाय. मोदी व श्री. नलावडे, उपअभियंता माधव पाटील, ग्रामसेवक यशोदा बनकर, तलाठी स्मिता शिकें, मुख्याध्यापिका स्वातीपालकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मंत्री गोरे यांनी दिली. या वेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, तसेच नायगाव ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांना आवश्यक सूचना दिल्या.
जयंती उत्सव व स्मारक भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून लाखोंच्या संख्येने सर्व समाज बांधव नायगाव येथे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सावित्रीमाईंची जन्मभूमी नायगाव येथे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

