स्थैर्य, मुंबई, दि.१३: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून आपण विचित्र (कोरोना) परिस्थितीचा सामना करत आहोत. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील सर्व जनतेचे आभार मानले आहे. या अडचणीच्या काळात नागरिकांनी साथ दिली. सर्व धर्मियांनी आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेत संयम पाळल्यामुळे जनतेचे आभार मानले.
पावसाळी अधिवेशन यशस्वीरित्या पार केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्वधर्मियांचे आभार मानले. तसेच महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव जो आखला जातोय. त्याविषयी मी बोलणार आहे. मी बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही की, माझ्याकडे उत्तर नाही.महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव जो आखला जातोय. त्याविषयी मी बोलणार आहे.
मिशन बिगिन अगेनमध्ये महाराष्ट्राच्या बदनामीचा कट आखला जात आहे. ही गोष्ट अजिबात सहन केली जाणार नाही. यासोबतच लोकांना वाटत आहे की, मिशन बिगिन अगेनमध्ये पुन्हा एकदा राजकारण केलं जातं आहे. जे राजकारण करत आहेत त्यांना करु द्या. मी सध्या या सगळ्यावर शांत असल्याचंही ठाकरे म्हणाले. यावर मी एक दिवस भाष्य करणार आहे असे ते म्हणाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.