जोर मध्ये  बिबट्याच्या हल्ल्यात  बैल ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वाई, दि.१९: धनगरवस्ती, जोर  ता. वाई येथील गणेश पाकू ढेबे  यांचा मंगळवार दि 16 रोजी सायंकाळी साडेसात च्या दरम्यान   बिबट्याने झडप घालून ठार मारले, गणेश ढेबे  यांचे अंदाजे  चाळीस हजाराचे नुकसान झाल्याची तक्रार जोर  गावाचे पोलीस पाटील यांनी वनविभागात दिली आहे, वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी कि धनगरवस्ती, जोर  हा वाई च्या पश्चिम भागातील दुर्गम भाग असून या परिसरात घनदाट जंगल आहे, या जंगलात अनेक रानटी हिंस्त्र प्राणी राहत असून या भागात बिबट्याचा ही वावर असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले आहे, बांधलेल्या बैलावर  बिबट्याने हल्ला केल्याने कोणालाही कळायच्या आतमध्ये बिबट्याने आपला डाव साधून बैलाचा जीव घेतला, ग्रामस्थांनी आरडा-ओरड केल्या नंतर बिबट्याने जंगलात धूम ठोकली, परंतु गरीब शेतकऱ्याचे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे, वनविभागाकडून संबधित शेतकर्याला नुकसान भरपाई म्हणू चाळीस हजार देण्यात येणारा आहेत, असे वनविभागाचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी सांगितले आहे, या परिसरात शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने अनेकांच्या दावणीला शेळी, मेंढी, म्हैस, गाय, व बैल अशी जनावरे पाळलेली आहेत, त्यांच्या निघणाऱ्या दुधावर लोकांचा उदरनिर्वाह चालू असतो, त्यांचे उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नाही, भात पिक आणि पाळीव जनावरे हाच मुख्य व्यवसाय असल्याने बिबट्याच्या अचनाक होणाऱ्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे, तसेच नागरिकांचाही जीव टांगणीला लागलेला आहे.
वनविभाग त्यांना त्वरित नुकसान भरपाई देणार आहे, जांभळी पासून त्या परिसरातील जंगली भागात बिबट्या सह काही जंगली हिंस्र प्राण्यांचे वास्तव्य आहे, तरी परिसरातील नागरिकांनी आपल्या पाळीव जनावरांसह स्वतःचे रक्षण करावे, त्यातूनही नुकसान झाल्यास वनविभाग शेतकऱ्यांवर अन्याय होणार  नाही, त्वरित शासनाच्या नियमाप्रमाणे त्वरित नुकसान भरपाई देण्यात येईल, वाई च्या वनविभागात तशी नोंद करण्यात यावी :- महेश झांजुर्णे (वनक्षेत्रपाल,वनविभाग वाई)

Back to top button
Don`t copy text!