1 ते 10 मार्च दरम्यान होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन, 8 मार्चला सादर होणार अर्थसंकल्प


स्थैर्य, मुंबई, दि.२६: येत्या 1 मार्चपासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. 1 मार्च ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. 1 मार्चपासून होत असलेल्या अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, अनिल परब यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

2020 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर गुंडाळण्यात आले होते. आता एका वर्षांनी पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करावा लागला आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी भाजपकडे अनेक मुद्दे आहेत. यात शिवसेना मंत्री संजय राठोड प्रकरण, वीज बिल, कोरोना रुग्णांची वाढती संख्या. दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात होणार नाही यावर शिक्कामोर्तब झाला आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालीच विधीमंडळाचे कामकाज चालवले जाईल.


Back to top button
Don`t copy text!