दैनिक स्थैर्य । दि.०९ मार्च २०२२ । सातारा । सातारा पालिकेने सव्वातीनशे कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. हे बजेट म्हणजे केवळ फसव्या आकड्यांचा खेळ आहे हे बजेट जिल्हाधिकाऱ्यांनी ना मंजूर करावे अशी मागणी दिशा विकास मंचचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की सातारा पालिकेने यंदाच्या दोन हजार बावीस तेवीस या बजेटमध्ये सव्वा तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक विविध विकास कामासाठी केली आहे यामध्ये अखेरची शिल्लक दोन लाख 90 हजार रुपये दाखवण्यात आली आहे पालिकेच्या प्रशासनाने मंजूर केलेले अंदाजपत्रक फसवेगिरी असून हा आकड्यांचा खेळ आहे . या बजेटमध्ये पालिकेने स्वतःच्या उत्पन्न स्तोत्रा कडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राखीव निधीतून रक्कम काढावी लागत आहे . आणि काढलेली सुद्धा आहे िल्हाधिकार्यांनी गतवर्षीच्या बजेटला मंजुरी देताना काही अटी स्पष्ट केल्या होत्या त्या बहुतांश अटी पालिकांनी पाळलेल्या नाहीत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असताना त्याचा उल्लेख बजेटमध्ये करण्यात आलेला नाही म्हणूनच हे अंदाजपत्रक दिशाभूल करणारे आहे े अंदाजपत्रक शिलकी नसल्यामुळे जिल्हाधिकार्यांनी या अंदाजपत्रकाला मंजुरी देऊ नये नगरपालिका अधिनियम 1965 च्या तरतुदी व अकाउंट कोड ते उल्लेख या बजेटमध्ये नसल्याचा आरोप सुशांत मोरे यांनी केला आहे.