दैनिक स्थैर्य । दि. ०९ जून २०२३ । बारामती । कीप ओन रोलिंग स्केटिंग क्लब मधील तीन विद्यार्थी १.शिवतेज दातीर २.सुगंध कुमावत आणि ३.वेदांत आटोळे यांनी प्रशिक्षक तनिष्क सचिन शहा यांच्यासहित आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले आहे. २७ मे ते ३१ मे रोजी बेळगाव मधील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबने आयोजित केलेले “मोस्ट पीपल कम्प्लेटिंग हंड्रेड मीटर ऑन स्केट्स इन द लिस्ट अमाऊंट ऑफ टाईम” (४८ तासात).
या प्रेरक गीता मध्ये हे रेकॉर्ड एकाच वेळी 300 मुलांनी पूर्ण केले . त्यामध्ये बारामतीतील शिवतेज , सुगंध आणि वेदांत यांनी मेहनत घेऊन दिलेला टास्क पूर्ण केला व आपले नाव या रेकॉर्डसाठी नोंदवले. हे रेकॉर्ड म्हणजे ४८ तासांचा रिले होता. ऊन , वारा , पाऊस या असेल त्या परिस्थितीत तसेच दिवस रात्र न पाहता पूर्ण ४८ तास हे रेकॉर्ड चालू होते. शारीरिक कस व बौद्धिक क्षमता यांची कसोटी असते त्यासाठी नित्य सराव व उत्तम निरोगी शारीरिक क्षमता लागते.बाल वयात पालका शिवाय राहणे व यश मिळवणे अवघड असताना गिनीज बुक मध्ये पहिले बारामतीकर म्हणून नोंद केल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे