
दैनिक स्थैर्य | दि. २८ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
डॉ. आम्रपाली कोकरे यांनी दिलेले ‘मल्हार युग’ या पुस्तकामुळे समाजातील प्रत्येक घरात मल्हारराव होळकर निर्माण होतील. त्यासाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अनुप शहा यांनी केले.
फलटणसारख्या निमशहरी भागामध्ये राहून महान योद्धा मल्हारराव होळकर यांच्या जीवनचरित्राने प्रभावित होऊन त्यांच्या आयुष्याचे सर्वकाही शब्दबद्ध करण्याची किमया फलटणच्या डॉ. सौ. आम्रपाली कोकरे यांनी आपल्या पुस्तक ‘मल्हार युग’मध्ये साधली आहे. अप्रतिम लेखन शब्दरुपामध्ये मल्हाररावांना डोळ्यांसमोर उभा करतो. अत्यंत कर्तृत्ववान असलेला मल्हार यांचे जीवनचरित्र समाजाला कळलं पाहिजे. समाजामध्ये प्रत्येक घरात मल्हारराव घडला पाहिजे, ही तळमळ घेऊन सर्वप्रकारचे कष्ट, संकटांना समोर जाऊन या महिलेने जिद्दीने लिखाण करून मल्हारराव होळकर यांचा जीवनपरिचय समाजापुढे मांडला आहे. आज त्यांच्या हस्ते हे पुस्तक स्वीकारताना धन्य झालो, असे विचार अनुप शहा यांनी व्यक्त केले आहेत.