दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२३ । सातारा । शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शासन आपल्या दारी अभियानांतर्गत सातारा तालुक्यातील परळी मंडळामधील ठोसेघर येथे शिबीर संपन्न झाले. या शिबिरामध्ये विविध विभागाकडून 912 पात्र लाभार्थ्यांना विविध दाखले तसेच योजनांचा लाभ देण्यात आला.
यावेळी सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार राजेश जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबीरामध्ये महसूल विभागाने 263 लाभार्थ्यांना विविध दाखल्याचे वाटप केले. त्यामध्ये 67 उत्पन्नाचे दाखले, 64 रहिवासी दाखले, 20 जातीचे दाखले, 92 सात – बाराचे व 20 आठ अ चे उतारे यांचे वाटप करण्यात आले. पुरवठा विभागामार्फत 112 शिधापत्रिका संबंधित प्रकरणांची निर्गती करण्यात आली. निवडणूक संदर्भात विविध फॉर्मचे 33 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. सीएससी केंद्राकडील सेवांचा 19 जणांना लाभ देण्यात आला. कृषि विभागाने 22 लाभार्थ्यांना लाभाचे वाटप केले. त्यामध्ये फळबाग – 8, यांत्रिकीकरण -2, बियाणे वाटप – 10 आणि शेततळे – 2 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. आरोग्य विभागाने 183 जणांची आरोग्य तपासणी केली. ग्रामपंचायत विभागाने 56 मृत्यू दाखले, 67 आठ अ उतारे, 46 पाणी तपासणी दाखले आणि 78 इतर दाखले यांचे वाटप केले. तसेच या शिबिरीवेळी 26 आधारकार्ड दुरुस्तीची सेवाही पुरवण्यात आली.