जिल्हा तालीम संघ परिसरात आढळला युवकाचा मृतदेह


दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । सातारा । सातारा शहरातील तालीम संघ परिसरात घरात हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खून की आत्महत्या याबाबत पोलीस साशंक असून, शवविच्छेदन अहवालानंतर नेमके कारण समजू शकणार आहे. दरम्यान, या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, संदीप दबडे (वय ३०) यांचा राहत्या घरात हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. घराच्या परिसरात आज (शनिवार) सकाळी दुर्गंधी येवू लागल्याने नागरिकांनी ही घटना सातारा शहर पोलीस ठाण्यात कळवली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर घराचा दरवाजा उघडला असता, आत मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे हातपाय बांधण्यात आल्याने ही प्रथमदर्शनी हा खून आहे का? अशी चर्चा परिसरात सुरू होती.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर युवकांच्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नेला असून, त्यानंतर नेमके मृत्यूचे कारण समजणार आहे.


Back to top button
Don`t copy text!