स्थैर्य, फलटण, दि. 4 : काल दिनांक २ जून 2020 रोजी १९.०० वाचे सुमारास फलटण येथील माळजाई मंदीरामध्ये विजय रामचंद्र मुळीक वय-५७ वर्षं रा. सावतामाळी नगर, कोळकी, फलटण हे मृत अवस्थेत मिळून आले. पोस्टमॉर्टम केले असता सदर इसमाचा मृत्यू हा लिव्हर खराब झाल्यामुळे व हार्ट अटॅकमुळे झाला आहे. सदर मयत हे राज्य उत्पादन खात्यामध्ये हवालदार पदावर कोल्हापूर याठिकाणी नेमणूकीस होते. लाॅकडाउन नंतर ते नोकरीच्या ठिकाणी गेले नव्हते. प्राथमीक चौकशी मध्ये सदर मयत हे दारूच्या आहारी गेले होते. ते सकाळपासून घराच्या बाहेर पडले होते दारू पिल्यानंतर ते माळजाई मंदीर या ठिकाणी आले असावेत असा अंदाज आहे. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्याकडे अकस्मात मयत नं.२२/२० crpc क. 174 अन्वये नोंद झाली आहे. सदर मयताचा तपास पोलिस हवालदार लावंड हे करीत आहेत. अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिली.