भाजपा हा भेदभाव लक्षात ठेवेल; चंद्रकांत पाटलांची श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांना पत्र लिहून नाराजी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


                                        

स्थैर्य, मुंबई, दि.१०: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना पत्र लिहिलं असून उपसभापती निवडणूक प्रकरणी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. दुजाभाव व प्रभावाखाली काम करण्याचा आपण कळस गाठला असून भाजपा हा भेदभाव लक्षात ठेवेल असं त्यांनी म्हटलं आहे. सोबतच भाजपाविरोधात कितीही षडयंत्र रचलीत तरी तुम्ही त्यात यशस्वी होणार नाही असंही ते म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी पत्र ट्विट केलं आहे.

चार वर्षांपूर्वी सभापती म्हणून निवडताना आयुष्यात राष्ट्रवादीला कधीही न केलेले मतदान आम्ही केले. परंतू आमचे सरकार असतानाही तुम्ही कधीही आम्हाला सहकार्य केले नव्हते. परंतू आज तर दुजाभावाचा, दबावाखाली काम करण्याचा आपण कळस गाठला आहे.

कोरोनामध्ये उपसभापतीची निवडणूक? भाजपाचे तीन सदस्य कोविड बाधित तरीही निवडणूक? सभागृहात ७८ च्या ऐवजी ६० सदस्य उपस्थित तरीही निवडणूक? कोर्टात केस पेंडिंग, तरीही निवडणूक? आश्चर्य आहे. एक निस्पृह व्यक्तीमत्व म्हणून आपल्याबद्दल आमच्या मनात असलेला आदर आज निश्चितच कमी झाला आहे. असो राजकारणात हे चालायचंच!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!