जन्मदात्या मातेने केला पाच महिन्याच्या चिमुकल्याचा खून

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ एप्रिल २०२२ । फलटण ।  तरडगाव ता. फलटण येथे जन्मदात्या आईनेच केला पाच महिन्याच्या चिमुकल्या मुलाचा ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक तोंड दाबुन खून केल्याच्या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे.

या बाबत लोणंद पोलीसाकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, पांढरी तरडगाव ता. फलटण येथील सौ.आरती सोमनाथ गायकवाड या महिलेने लोणंद पोलीस स्टेशनला फोन करुन तिच्या पाच महिण्याच्या लहान बाळाला दि.12-4-2022 रोजी दुपारी 2 वाजता जिवे ठार मारुन पुरलेले आहे . तुम्ही लगेच गाडी पाठवा . नाहीतर मी आणखी दुसऱ्या कोणाचातरी खुन करीन असे सांगितले होते. त्यावरून पोलीसांनी तिचेकडे जावुन खात्री केली असता तिने तिचे लहान मुलगा कार्तिक सोमनाथ गायकवाड वय पाच महिने याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक तोंड दाबुन जिवे ठार मारुन खुन केला असल्याचे सांगितले. याची माहिती लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी व सहकाऱ्यांसमवेत त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन माहीती घेतली व सदर महिलेस ताब्यात घेतले.या प्रकरणी पो.कॉ. विठ्ठल काळे यांनी लोणंद पोलीसात फिर्याद दिली असुन महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खून प्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. आरती गायकवाड या महिला संशयीत आरोपीला फलटण न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

आज रविवार दि.24 रोजी सपोनि विशाल वायकर व सहकाऱ्यांनी सरकारी पंचासमवेत घटनास्थळाचा पंचनामा करून ज्या ठिकाणी चिमुकल्याचा मृतदेह पुरला होता . त्या ठिकाणी खोदण्यात आले असता मृतदेह मिळुन आला. या मृतदेहाचे पोस्ट मार्टम जागेवरच तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांनी केले.
पुढील तपास सपोनि विशाल वायकर करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!