दैनिक स्थैर्य । दि.१२ एप्रिल २०२२ । फलटण । सोनगाव येथे आज दि.११/०२/२०२२ रोजी क्रांतीसुर्य, महामानव, थोर विचारवंत ,प्रज्ञा सूर्य,थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळेस गावातीलच ज्येष्ठ व वयस्कर दाम्पत्य श्री नामदेव संभाजी गोरे व त्यांच्या सुवेद्य पत्नी सौ सुभद्रा नामदेव गोरे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले , मूळचे हे दांपत्य म.फुले यांच्याच कटगुण गावचे आहेत व म. फुलेंच्या मूळ आडनाव गोरे होते हे सर्वश्रुत आहेच त्याचप्रमाणे यांचेही आडनाव गोरे आहे तसेच जयंतीचा विशेष भाग म्हणजे या वयोवृद्ध गोरे दांपत्त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा परिधान केली होती , वृद्धपकाळामुळे नामदेव गोरे हे चालण्याच्या अवस्थेत नसतानाही अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी शक्य केली व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दलची आत्मीयता,आदर व प्रेम हे दाखवून एक आदर्श निर्माण केला.
त्याचबरोबर कार्यक्रमास उपस्थित गावातीलच प्रतिष्ठित उभयतांच्या हस्ते व सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ व तरुण युवकांच्या हस्ते पूजन करण्यात आले.या प्रसंगी मनोगते झाली त्यामध्ये मा.श्री पोपटराव बुरुंगले (मा.सरपंच सोनगाव व विद्यमान सदस्य) व प्रा.राजेश निकाळजे यांनी म.फुले यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले .
गावातील सर्व तरुण युवकांनी या जयंतीच्या माध्यमातून महात्मा फुलेंचे कार्य, इतिहास व विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले. या कार्यक्रमाच्या उपस्थिती मध्ये साहेबराव टेंबरे , महादेव ओवाळ, हनुमंत गायकवाड , दिलीप गायकवाड , राजेंद्र टेंबरे ,ईश्वर निकाळजे, नारायण तुपे, संदीप पिंगळे, दत्तात्रय ननावरे , बाळासो यादव, महादेव चव्हाण, चंद्रकांत शेंडे , बाळासो गोरे,उत्तम शेंडे, सचिन शेवते, राजेंद्र लोंढे , बाळासो लोंढे, अवि गोरे ,जगन्नाथ नाळे, हनुमंत जाधव, संदीप ओवाळ, लखन खरात, निखिल कांबळे, दादा सोनवणे, नामदेव शिंदे , बाबासो जाधव, सुरेश गेजगे, हरीचंद्र लोंढे, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन पोपटराव बुरुंगले , राजेश निकाळजे , लखन पिंगळे, राजेंद्र आडके , महादेव कांबळे, दिलीप भंडारे, बाबासो टेंबरे, शिवाजी गायकवाड, शिवाजी ढवळे, सुरेश पवार, राहुल गायकवाड, रमेश मदने, अमोल सस्ते ,सुधीर ओवाळ, गणेश कांबळे,राजेंद्र पाटोळे, ज्ञानदेव शेंडे,संतोष आडके,सचिन नाळे, संदीप नाळे, सचिन शेंडे, रोहन शेंडे, संतोष गोरवे, लक्ष्मण गायकवाड,आदित्य ओवाळ, ओम टेंबरे, अक्षय जगताप, चंदू गोरवे, सचिन कांबळे व इतर ग्रामस्थ , महिला भगिनी उपस्थित होते.