साखरवाडी साखर कारखान्यात १ ते १५ फेब्रुवारीदरम्यान गळीतास आलेल्या उसाचे बिल २७ फेब्रुवारीला शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
श्री दत्त इंडिया प्रा.लि. साखरवाडी हा साखर कारखाना स्थापन झाल्यापासून आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त गळीत झालेल्या गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये ३१ जानेवारी २०२३ पर्यंत आलेल्या ४६१९५३.३५६ मे. टनाचे उसाचे बिल प्रती टन रक्कम रु. २७७२/- प्रमाणे अदा करण्यात आलेले आहे. तसेच १ फेब्रुवारी २०२३ ते १५ फेब्रुवारी २०२३ यादरम्यान गळीतास आलेल्या उसाचे बिल २७ फेब्रुवारी २०२३ रोजी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. त्याबरोबरच १६ फेब्रुवारीपासून जो ऊस गळीतास येईल त्या उसाचे बिल ऊस गळीतास आल्यापासून सात दिवसांमध्ये शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल, अशी माहिती कारखाना संचालक मंडळातर्फे एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

निवेदनात संचालक मंडळाने म्हटले आहे की, गळीत हंगाम २०२२-२०२३ मध्ये कारखान्यात गळीतास आलेल्या उसास चांगली रिकव्हरी येत असल्याने गळीतास आलेल्या उसास व गळीतास येणार्‍या उसास दुसरा हप्ता देण्याचा कंपनी विचार करत आहे. त्यामुळे परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी त्यांच्याकडे असणारा सर्व ऊस आपल्या कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे.

मागील गळीत हंगाम २०१९-२०२०, २०२०-२०२१, २०२१-२०२२ या तीनही गळीत हंगामात सर्व ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी सर्वोतोपरी सहकार्य श्री दत्त इंडिया प्रा.लि. साखरवाडी या साखर कारखान्यास केले, त्याबद्दल सर्व ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे कंपनी आभार मानत आहे. यापुढेही शेतकर्‍यांनी असेच सहकार्य करावे, असे निवेदनात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!