
स्थैर्य, सातारा, दि. १९: नागठाणे, ता. सातारा येथून हॉस्पिटलसमोरून अज्ञाताने दुचाकी चोरून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याची फिर्याद प्रवीण वसंत काकडे (रा. उंब्रज, ता. कराड, मूळ रा. केळोली, ता. पाटण) यांनी रात्री उशिरा बोरगाव पोलीस ठाण्यात दिली.
प्रवीण काकडे यांच्या वडिलांना नागठाणे येथील ज्ञानदीप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. गुरुवारी दुपारी ते वडिलांना पाहण्यासाठी नागठाणे येथे हॉस्पिटलला आले होते. यावेळी त्यांनी हॉस्पिटलसमोर दुचाकी उभी केली होती.
वडिलांना पाहून ते परत जाण्यासाठी निघाले असता त्यांची दुचाकी तेथे नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी परिसरात शोध घेऊनही दुचाकी न मिळाल्याने रात्री उशिरा याची फिर्याद बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल केली. पुढील तपास हवालदार रामचंद्र फरांदे करत आहेत.