
स्थैर्य, सातारा, दि.२४: जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज गुरुवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 1.3 मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 245.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 0.1 (260.6) मि. मी., जावळी- 4.4(419.3) मि.मी., पाटण-1.2 (337.8) मि.मी., कराड-0 (277.4) मि.मी., कोरेगाव-0 (164.8) मि.मी., खटाव-0 (112.5) मि.मी., माण- 1.2 (74.2) मि.मी., फलटण- 0.1 (83.6) मि.मी., खंडाळा- 0.1 (145.1) मि.मी., वाई-3.4 (265.1) मि.मी., महाबळेश्वर-10.3 (805.2) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरणात आजअखेर 36.32 टीएमसी (36.28 टक्के) एवढा उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी 16 (845) मि.मी. आहे.