स्थैर्य, सातारा दि.२८: सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णांलयांतील उपलब्ध बेडची माहिती 1077 या दूरध्वनीवर माहिती नागरिकांना मिळत होती. ही माहिती एका क्लिकवर मिळावी म्हणून लवकरच लिंक व वेबसाईटमार्फत उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना मिळेल. यामध्ये ऑक्सिजन व आयसीयु बेडची माहिती उपलब्ध होईल असे, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले की, यापूर्वी आपल्याकडे 300 ते 350 ऑक्सिजन बेड उपलब्ध होते. साधारणत: पुढच्या आठवड्यापासून 1300 बेड उपलब्ध होतील तसेच आयसीयु बेडची संख्याही 70 ते 80 ने वाढेल. तथापि, सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी होम आयसोलेशन व्हावे, त्या संदर्भातील सूचना पूर्वीच प्रसिद्ध केल्या आहेत. अत्यंत आवश्यक असलयासच बेड उपलब्ध होतील. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी हॉस्पिटल बेडची मागणी करु नये अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.