दैनिक स्थैर्य | दि. २६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
राजमाता अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळ अहिल्यानगर, फलटण या मंडळाने यावर्षी भव्य असा आकर्षक गोल्डन पॅलेस हा देखावा उभारला आहे. त्यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केली असून श्रींची आकर्षक मूर्ती त्यामध्ये विराजमान केली आहे. मुख्य गाभार्यात श्रींची प्रतिमा खूप सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर आकर्षक सजावट करून थ्री डी इफेक्ट स्क्रिन पॅलेस मध्ये लावून विविध प्रकारचे निसर्ग सिन आणि ग्राफिक्समध्ये आकर्षक देखावा सुंदर म्युझिक स्क्रिनवर सादर केला आहे.
या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संदीप चोरमले हे आहेत. या मंडळाचे हे १४ वे वर्ष आहे. सालाबादप्रमाणे मंडळाने सभामंडपात छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक अशी मूर्ती विराजमान केली आहे. छोटे कारंजे बसविले आहेत. त्यामुळे या ठिकाणी नागरिक सेल्फी काढत आहेत. हा देखावा पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत. यापूर्वीही मंडळाने खूप मोठे आकर्षक देखावे सादर केले आहेत. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळेच हा भव्य आकर्षक असा देखावा उभा करू शकलो, असे मंडळाचे संस्थापक संदिप चोरमले यांनी सांगितले.