
दैनिक स्थैर्य । 18 मे 2025। सातारा । पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी येथील टोलनाक्याच्या येण्याच्या आणि जाण्याच्या मार्ग प्रकारात नुकताच बदल करण्यात आला आहे. हा टोल नाका नव्या पद्धतीने उभारण्यात आहे. ऐन मे महिन्यातही गर्दीच्या वेळी ये, जा करण्यासाठी चार चाकी वाहनांना फास्ट टॅगद्वारे टोल भरताना अक्षरशः काही सेकंदाचाच वेळ लागत आहे. त्यामुळे या टोल नाक्यावर तरी पूर्वी दिसणार्या लांबलचक वाहनांच्या रांगा आता बंद झाल्या आहेत त्याचे हे सुखद चित्र आपल्या कॅमेर्यात टिपले आहे. पत्रकार अतुल देशपांडे यांनी..