बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने वार्षिक जनरल सभा मोठ्या उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२२ । सातारा । बौद्धजन सहकारी संघ ता. गुहागर जिल्हा रत्नागिरी या संघाची वार्षिक जनरल सभा मा. सिद्धार्थ पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा येथे संपन्न झाली, सदर प्रसंगी संपूर्ण विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती कमिटी, विभाग अधिकारी, चार समित्या, त्यांच्या पोटसमित्या त्यांचे सन्मानिय पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, या कार्यक्रमास माजी विश्वस्त जाधव, कालकथित कार्यकर्त्यांस श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सरचिटणीस संजय तांबे यांनी करून संपूर्ण मागील वृतांत व अहवाल सादर केले, तसेच तालुका संघाची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी पतपेढी निर्मिती व विद्यमान घटनेत बदल या महत्त्वाच्या विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात सल्लामसलत करून अहवाल मंजूर करून घेतले, तसेच संघाची पुढील वाटचाल या संदर्भात कार्याध्यक्ष दिपकजी मोहिते यांनी सविस्तर माहिती दिली, सभेला संबोधित करताना माजी कार्याध्यक्ष संजय जाधव, माजी उपकार्याध्यक्ष दीपक जाधव, सुभाष मोहिते, अरुण जाधव, शांतिदुत जाधव, न्यायदान कमिटी अध्यक्ष शशिकांत मोहिते, नितीन सिद्धार्थ सावंत, बाळकृष्ण कदम आदी उपस्थित मान्यवरांनी आपले मोलाचे विचार मांडून सर्वांस संघाला दिशा देण्याच्या दृष्टीने बहुमूल्य सूचना केल्या.

पतपेढीच्या कामकाजात मोलाचे सहकार्य करून त्याचा संपूर्ण मसुदा तयार करून मध्यवर्ती कमिटीला सहकार्य केल्याबद्दल संघाचे हिशोबणीस संदेश गमरे यांचे विशेष कौतुक करण्यात आले, तसेच पतपेढीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून तिला योग्य दिशा देण्याचे कार्य यशस्वीरीत्या करणारे प्रमुख विश्वस्त संजय पवार, शांतिदुत जाधव, शैलेंद्र पवार, जितीन नागे, विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, संदेश गमरे यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

सदर जनरल सभेस तालुक्यातील सर्व सभासद, पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर हितचिंतकांनी मध्यवर्ती कमिटीने कोरोना महामारी ते आतापर्यंत ऑनलाइन वर्षावास मालिका, गरजूंना विध्यार्थ्यांना मदत, धम्मदान, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, श्रामनेर शिबीर आयोजन, दिनदर्शिका प्रकाशन आदी केलेल्या उदात्त कार्याचे व राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक करून सर्वाना धन्यवाद दिले व संघ उत्तरोत्तर असेच कार्य करत राहो व त्याच गती मिळो अश्या शब्दात शुभेच्छा दिल्या, उपस्थितांच्या समंजस स्वभावामुळे सदर सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली त्याबद्दल अध्यक्ष सिद्धार्थ पवार आणि सरचिटणीस संजय तांबे यांनी सभागृहाचे आभार मानून सदर सभेची सांगता केली.


Back to top button
Don`t copy text!