कोरोना रुग्णाला घेवून जात जाणारी रुग्णवाहिका खंबाटाकी घाटात पलटी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २७: पुणे सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोर येथून ऑक्सीजन लावून एक कोरोना रुग्णाला घेवून वाईकडे निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात होवून पलटी झाली.

याबाबतची मिळालेली माहिती अशी की, भोर येथील एक कोरोना बाधित असलेला रुग्ण त्यास ऑक्सीजन लावून वाईच्या घोटावडेकर हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिका (एमएच 01बीएस0113) मधून वाईकडे जात होती. रुग्णवाहिका दि. 26 रोजी सायंकाळी महामार्गावर खंबाटकी घाटाच्या मध्यभागी आली. यावेळी पावसामुळे निसरडे झाल्याने चालक सागर अलगुडे याचा रुग्णवाहिकेवरील ताबा सुटला व रुग्णवाहिका डोंगर कड्यावर जावून आदळून पलटी झाली.

अपघातग्रस्त रुग्णवाहिकेतील कोरोनाग्रस्त रुग्णा बराच वेळ वाचवण्यासाठी आरडाओरडा करत होता. त्याचा आवाज आधीच खोल गेल्याने बाहेरील लोकांना ऐकू येत नव्हता. त्याची ऑक्सी जन लेवल पहिल्यापासूनच कमी झाल्याने भोर येथील डॉक्टरांच्या सुचनेनुसार वाईच्या घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका निघाली होती.
या अपघाताची खबर खंडाळा पोलीस ठाणे आणि जोशी विहीर येथील महामार्ग पोलीस यांना समजताच ते तातडीने घटनास्थळी दाखल होवून दुसरी रुग्णवाहिका मागवून हा रुग्ण वाईच्या घोटवडेकर हॉस्पिटलकडे पोलिसांनी रवाना केला. या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

चालक सागर अलगुडेची तपासणी करावी
कोरोना रुग्ण घेऊन निघालेली भरधाव वेगाने निघालेली रुग्णवाहिका पलटी झाल्यानंतर चालक सागर अलगुडे हा नशेमध्ये असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, चालक सागर अलगुडे यांची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!