दैनिक स्थैर्य । दि. 19 जानेवारी 2023 । फलटण । फलटण शहरातील महावीर स्तंभ येथे असणाऱ्या “अथर्व स्वीट्स” या दुकानावर फलटण नगरपरिषदेकडून कारवाई सुरु आहे. “अथर्व स्वीट्स” हे दुकान सील करण्याची कारवाई फलटण नगरपरिषदेकडून आज दुपार पासून सुरु आहे. या कारवाईमुळे फलटण शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
फलटण नगरपरिषद मालकीचे रविवार पेठ येथील राजधानी टॉवर्समधील टेम्पररी भाडेकरू सौ. ज्योत्स्ना अमोल भोईटे यांच्या वापरातील दोन्ही गाळे व टेम्पररी भाडेकरू रोहन सुभाष पिसाळ यांच्या वापरामधील दोन्ही गाळे याची स्थगिती महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव यांच्या पत्रानुसार उठवण्यात आली असल्याने आज फलटण शहरातील महावीर स्तंभ येथे असणाऱ्या “अथर्व स्वीट्स” हे दुकान सील करण्याची कारवाई नगरपालिकेकडून सुरु आहे.