दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
धुळदेव, ता.फलटण येथे संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची ७३७ वी पुण्यतिथी सुवर्णकार समाजबांधव आणि ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
पुण्यतिथीदिवशी पहाटे धुळदेव येथील संत सावता माळी मंदिरामध्ये असलेल्या श्री नरहरी महाराजांच्या मूर्तीला आभिषेक घालण्यात आला. पुण्यतिथी निमित्ताने मंदिरात सप्त्याचे आयोजन करण्यात आले होते. गावामधील महिला व पुरूषांनी यामध्ये सहभाग घेतला होता. महिला व पुरूषांनी फुगडी, भजने, अभंग गात पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात टाळमृदूंगाच्या गजरात साजरा केला. यावेळी संत नरहरी महाराजांच्या नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.
सुश्राव्य किर्तनानंतर नरहरी महाराजांच्या मूर्तीची आरती करण्यात आली. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. नगरसेवक अजय माळवे अशोकशेठ शहाणे, धुळदेवचे सरपंच व्यंकटराव दडस, मार्केट कमिटीचे संचालक परशुराम फरांदे, पाणी पुरवठा सोसायटीचे चेअरमन माणिकराव कर्णे, धुळदेव येथील सुवर्णकार समाजाचे जेष्ठ विलास नांदले, अॅड. हरिष महामुनी, प्रा. संजय दीक्षित, राहुल महामुनी, विकास नांदले, शिंदे सर तसेच महिला-पुरूष भाविक भक्त मंडळी, बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)