कुरोशी येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू बेल एअर हॉस्पिटलमध्ये झाला नाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 11 : काल संध्याकाळी जिल्हा माहिती कार्यालयाकडून दिलेल्या बातमीत “महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी येथे मुंबईवरुन प्रवास करुन आलेल्या 55 वर्षीय पुरुषाचा बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी येथे मृत्यू झाला आहे. या 55 वर्षीय पुरुषाचा नमुनाही तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे” असा मजकूर दिला होता. तथापी महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार सदर 55 वर्षीय पुरुष कुरोशी या गावचा असून मंगळवारी रात्री सपत्नीक मुंबईवरुन गावी आला होता. गावात त्याच्या भावाचे छोटे हॉटेल असून या ठिकाणी त्यांना विलगीकरणात ठेवले होते. पहाटे पत्नी झोपेत असताना सदर व्यक्तिने बाहेर जावून झाडाला गळपास घेवून आत्महत्या केल्याचे निर्दशनास आले. मृत्युनंतर बेल एअर हॉस्पिटल मध्ये नेवून त्याच्या स्त्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यामुळे सदर व्यक्तिचा मृत्यू बेल एअर हॉस्पिटलमध्ये झाला नाही. असा खुलासा जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात येत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!