कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) यांचा 30 वा स्मृतिदिन संपन्न


दैनिक स्थैर्य । 17 जुलै 2025 । फलटण । येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्यावतीने स्वर्गीय कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ नाना यांचा 30 वा स्मृतिदिन संपन्न झाला.

या कार्यक्रमात श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी(बेडके), संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी, सी. एल पवार, संस्थेचे मानद सचिव डॉ.सचिन सुभाषराव सूर्यवंशी, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), सदस्या ज्योतीताई सचिन सूर्यवंशी (बेडके),

सदस्य प्रकाश तारळकर शिवाजीराव बेडके, हणमंतराव निकम यांच्याहस्ते स्वर्गीय कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!