
दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
श्री सद्गुरू हरिबुवा महाराज यांचा १८३ वा प्रकट दिन रथोत्सव सोहळा वर्ष २३ वे या निमित्ताने श्री सद्गुरू हरिबुवा महाराज रथाचे रथपूजन विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्री सद्गुरू हरिबुवा साधू महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व श्री सद्गुरू हरिबुवा मठाचे मठाधिपती तसेच ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळाचे अध्यक्ष श्री. चंदूकाका वादे तसेच श्री सद्गुरू हरिबुवा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळाचे सर्व सदस्य व भाविक भक्तांच्या उपस्थितीत हरिबुवा महाराज की जयच्या नामघोषात रथाचे पूजन करण्यात आले.
संध्याकाळी ७ ते १० वाजेपर्यंत ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळाची भजन सेवा पार पडली. यावेळी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.