दैनिक स्थैर्य | दि. ३ एप्रिल २०२४ | फलटण |
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, अहिल्यानगर, गजानन चौक, फलटण येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा १६८ वा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
दैनंदिन कार्यक्रमांमध्ये मंगळवार, दि. ०९/०४/२०२४ (गुढीपाडवा) सकाळी ५.३० ते ७.०० श्रींच्या मूर्तीस अभिषेक, सकाळी ७.३० ते ८.०० श्रींची आरती, सकाळी ९.०० ते ६.०० विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन, सायंकाळी ७.३० ते ८.०० श्रींची आरती, रात्री ९.०० ते ११.०० ह.भ.प. संतोष महाराज भालेराव, अकोला यांचा भारुडाचा कार्यक्रम ( विनोदी व धार्मिक नाथ पारंपरिक).
बुधवार, दि. १०/०४/२०२४ श्रींचा प्रकट दिन, सकाळी ५.०० ते ७.०० श्रींचा अभिषेक, सकाळी ७.३० ते ८.०० श्रींची आरती, सकाळी ९.०० ते ६.०० रक्तदान शिबिर, सकाळी १०.०० ते १२.०० सद्गुरू हरिबाबा सांप्रदायिक भजनी मंडळाचे भजन, दुपारी १२.३० ते १.०० श्रींची महाआरती, आरती झाल्यानंतर १.०० ते ३.०० उपस्थित भावी भक्तांना महाप्रसाद वाटप, सायंकाळी ५.०० ते ७.०० ॐ दत्त चिले ओम भजनी मंडळाचे सुश्राव्य असे भजन, सायंकाळी ७.३० ते ८.०० श्रींची महाआरती, रात्री ८.०० ते ९.०० प्रसाद वाटप, रात्री १०.०० ते १२.०० श्री स्वामी समर्थ एक तारी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
जास्तीत जास्त भाविक भक्तांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावे, तसेच कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ अहिल्यानगर, गजानन चौक, फलटण यांनी केले आहे.