पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १५ वा हप्ता १५ नोव्हेंबरपासून अदा करण्यास सुरूवात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २३ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १५ वा हप्ता केंद्र शासनातर्फे दि. १५ नोव्हेंबर २०२३ पासून अदा करण्यास सुरूवात झाली आहे, अशी माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली.

याबाबत डॉ. अभिजित जाधव म्हणाले की, यापूर्वीचा १४ वा हप्ता केंद्र शासनातर्फे दि. २७ जुलै २०२३ पासून अदा करण्यात आला होता. यामध्ये फलटण तालुयातील ५३६७५ पात्र लाभार्थ्यांना आजअखेर १४ व्या हप्त्याचा लाभ देण्यात आला आहे. तसेच काही लाभार्थ्यांना तांत्रिक कारणास्तव याचा लाभ मिळाला नव्हता, त्यांचे प्रकरणी पडताळणी करून ते पात्र होत असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांचे स्तरावर त्यांचा लाभ पूर्ववत करण्याबाबत अलहिदा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

ज्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही, त्यांनी pmkisan.gov.in वेबसाईटवर जाऊन Farmer’s corner या पर्यायावर लीक करून Beneficiary Status वर जावे. तेथे आधार क्रमांक टाकून Get Data वर लीक केले असता आपला लाभ कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहे, हे समजून येईल. यासाठी आपल्याला जवळच्या महा-ई-सेवा केंद्रास भेट देऊन तिथूनही ही गोष्ट माहीत करून घेता येईल. तथापि असे लाभ न मिळालेले लाभार्थी हे तहसील कार्यालय, फलटण येथे गर्दी करून आपले स्टेटस चेक करून द्यावे, अशी विनंती करत असतात. याबाबत तहसील कार्यालयाकडून त्यांना वेळोवेळी सहकार्य करण्यात येते; परंतु अशा प्रकारे स्टेटस चेक करण्यात वेळ जात असल्याने पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास विलंब होतो, याची नोंद घेऊन शेतकर्‍यांना विनंती आहे की, त्यांनी स्वत:च्या मोबाईलवरील पद्धतीने अथवा महा-ई-सेवा केंद्रातून आपले स्टेटस चेक करून द्यावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.

दरम्यान, आयकर भरणारे अथवा शासकीय नोकरीमध्ये कार्यरत असणारे अथवा प्रतिमाह १००००/- रू.पेक्षा जास्त पेन्शन घेणारे एकूण ३५९४ अपात्र लाभार्थी यांनी लाभ घेतला असल्याने त्यांच्याकडून एकूण रकम रू. ४,२९,५२,०००/- वसूल करण्याची कार्यवाही संबंधितांना नोटीस देऊन सुरू करण्यात आली आहे, अशी माहितीही डॉ. जाधव यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!