दैनिक स्थैर्य | दि. ७ एप्रिल २०२३ | फलटण |
सस्तेवाडी रस्त्यालगत असणार्या दफनभूमीमध्ये वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीसाठी वैशिष्ठ्यपूर्ण योजनेतून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून निधी मिळाला आहे.
आज वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीसाठी वैशिष्ठ्य पूर्ण योजनेतून मिळालेल्या या निधीच्या कामाचे स्वरूप ठरविण्यासाठी सस्तेवाडी रस्त्यालगत असणार्या दफनभूमीमध्ये फलटण नगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव, माजी प्राचार्य रवींद्र येवले, सेंट्रल रेल्वे पुणे डिव्हिजन सल्लागार समिती सदस्य तानाजी करळे, प्रा. सतीश जंगम तसेच समाजातील ज्येष्ठ व बहुसंख्य नागरिक यांनी पाहणी केली.
यावेळी उपस्थित मान्यवर व समाजातील नागरिकांनी दफनभूमीसाठी निधी मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानले.