श्रीमंत संजीवराजेंच्यामुळे मिळाला बरडला पुर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ सप्टेंबर २०२२ । फलटण । संपूर्ण राज्यांमध्ये लंपी या आजाराने जनावरांच्या मालकांची झोप उडवलेली आहे. अशा मध्येच बरड पंचक्रोशी मध्ये असणाऱ्या जनावरांच्या मालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेले होते. त्याचे कारणही तसेच होते बरड येथे पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत नव्हता. परंतु सदरील बाब सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तातडीने निर्देश देऊन बरड येथे पशुवैद्यकीय अधिकारी याची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आलेली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बरड येथे पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत नाही त्यामध्येच संपूर्ण राज्यांमध्ये लंपी या आजाराने थैमान घातलेले आहे. त्यातच या आजाराने फलटणमध्ये शिरकाव सुद्धा केलेला आहे. ही बाब बरड ग्रामपंचायतचे सदस्य व प्रगतशील उद्योजक शेखर काशीद यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यास निर्देश देताच बरड येथे पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याचे आदेश पशुवैद्यकीय विभागाकडून निर्गमित करण्यात आले व सदरील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने तातडीने बरडचा पदभार सुध्दा स्वीकारला.

फलटण तालुक्यामधील कोणत्याही समस्या जर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आली तर सदरील समस्या ही तातडीने सोडवण्याचे काम श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे कायमच करीत असतात. त्याचाच प्रत्येक पुन्हा एकदा बरड ग्रामस्थांना यानिमित्ताने आला.


Back to top button
Don`t copy text!