दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑगस्ट २०२२ । बारामती । स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त सावळ.( ता.बारामती) येथील ज्ञानसागर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनीनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या राख्या जवानांना पाठविल्या, त्यांनी पोहचल्यावर राख्या मोठ्या प्रेमाने मनगटावरती बांधल्या.
सीमेवर लढणाऱ्या जवानांना कुठलाही सण साजरा करता येत नाही. देशाची सुरक्षा हेच एकमेव कर्तव्य त्यांच्यापुढे असल्यामुळे एक आगळावेगळा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करून सुंदर व सुबक राख्या नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध संकल्पनेतून बनवलेल्या राख्या पाहुन सीमेवरील जवान भाऊ मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थिनींनी आपल्या सीमेवरील जवान भाऊरायासाठी स्नेहभाव पत्र लिहून रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या. आजचे विद्यार्थी भारताचे भावी रक्षणकर्ते आहेत,देशासाठी प्रत्येकाने समर्थन, त्याग, देशप्रेम दर्शवित एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून जबाबदारी पार पाडली पाहिजे असे संदेशातुन जवानांनी व्यक्त केले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर आटोळे, विद्यालयाचे प्राचार्य श्री. दत्तात्रय शिंदे ,उपाध्यक्ष रेश्मा गावडे ,सचिव मानसिंग आटोळे, पल्लवी सांगळे, दीपक सांगळे, दीपक बीबे, सिईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, निलिमा देवकाते , स्वप्नाली दिवेकर, राधा नाळे व सांस्कृतिक वि. प्रमुख अर्चना भगत सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.