दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२२ । फलटण । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये काम करत असणाऱ्या कंत्राटदारांना बाजारभावापेक्षा कमी दराने महावितरणची कामे करावी लागत होती. परंतु गेले काही वर्षांपासून ही कामे बंद करण्याचा निर्णय कंत्राटदारांनी घेतलेला होता. ही बाब विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी तातडीने महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंघल यांना फोन करून सदरील प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश दिले. श्रीमंत रामराजेंच्या फोन नंतर महावितरण कंपनीचा राज्याचा बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली निघाला. याबद्दल फलटण तालुका इलेट्रीकल फेडरेशन असोसिएशनच्या वतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे विशेष आभार मानण्यात आले.
यावेळी विशाल कणसे, प्रवीण कोल्हे, इरफान शेख, स्वप्नील गायकवाड, सचिन निंबाळकर, समीर मेटकरी यांनी यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे विशेष आभार मानले. यावेळी फलटण तालुका इलेट्रीकल फेडरेशन असोसिएशनच्या वतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे आभार मानले.