दैनिक स्थैर्य । दि. १२ मे २०२३ । मुंबई । थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक विकार आहे जो शरीरातील हिमोग्लोबिनच्या उत्पादनावर परिणाम करतो. हा आजार झालेल्या रूग्णांनी वेळीच औषधोपचार घेतल्यास या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश येते, अशी माहिती जे.जे रुग्णालय मुंबई येथील औषध वैद्यकशास्त्राचे पथक प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.
जागतिक थॅलेसीमिया दिवस दरवर्षी 8 मे रोजी थॅलेसीमिया पीडितांच्या स्मरणार्थ आणि या आजाराने जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पाळला जातो. या दिनानिमित्ताने शासनामार्फत या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याअनुषंगानेच थॅलेसेमिया हा आजार काय आहे, त्याची लक्षणे आणि त्यावरील प्रभावी औषधोपचार पद्धती तसेच गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतची सविस्तर माहिती डॉ. मधुकर गायकवाड यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, शुक्रवार दि. 12 शनिवार दि. 13 आणि सोमवार दि. 15 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी घेतली आहे.