
दैनिक स्थैर्य । दि. २७ एप्रिल २०२२ । पुणे । महावितरणचे निवृत्त अभियंता सतिश ठकार व जिल्हाधिकारी (पुणे) यांच्या स्वीय सहाय्यक सौ. सुप्रिया ठकार यांची कन्या, ससून हॉस्पिटल येथील स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नजा ठकार व आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत कुलकर्णी यांचा शुभविवाह रविवार (दि. 24) रोजी पुणे येथील टर्फ क्लब येथे संपन्न झाला.
दरम्यान, नवदाम्पत्यांना भावी आयुष्यास शुभेच्छा देण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. विजया राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, राजशिष्टाचारचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, बीडचे जातपडताळणी विभागाचे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्यासह महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, अधिकारी व कर्मचार्यांची उपस्थिती होती.