केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा ठाकरे गटाकडून फलटण येथे निषेध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २३ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व चिन्हासंबंधी दिलेल्या दोषपूर्ण निर्णयाविरोधात मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, फलटण येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने शिवसेना व शिवसेना अंगीकृत सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांचे उपस्थितीत जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आमदार-खासदारांना मिळालेल्या मतांवर निकष लावून शिंदे गटाला ‘शिवसेना’ नाव व ‘धनुष्यबाण’ चिन्ह बहाल केले. प्रत्यक्षात मात्र प्रामुख्याने सदस्य नोंदणी फॉर्म व प्रतिज्ञापत्र जमा करण्यासाठी ठाकरे व शिंदे गटास आदेश दिले होते. जवळपास मागील सहा महिन्यांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेऊन, पदरमोड करुन लाखोंच्या घरात सदस्य नोंदणी फॉर्म व प्रतिज्ञापत्र जमा केले होते. ज्याची संख्या शिंदे गटापेक्षा संख्येने खुप मोठ्या पटीत होती. खरेतर निवडणूक आयोगाने त्यावर निर्णय देणं अपेक्षित होते. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील जनतेची देखील हीच अपेक्षा होती; परंतु निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा करत शिंदे गटाच्या बाजूने व चुकीचा निर्णय दिला असल्याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रासह भारतभर उमटत आहेत. निवडणूक आयोगाने भारतीय लोकशाहीची एकप्रकारे हत्याच केली आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्याचे आवाहनही नागरिकांना यावेळी करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना फलटण तालुकाप्रमुख प्रदिप झणझणे व विकास नाळे यांनी दिली.

निषेध आंदोलनवेळी निवडणूक आयोगाने दिलेल्या दोषपूर्ण निर्णयाविरोधात गगनभेदी घोषणा देऊन जाहीर निषेध व्यक्त केला गेला. तसेच काही झाले तरी महाराष्ट्रातील निष्ठावंत शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी कायम ठामपणे उभा राहणार असल्याचे सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी ठामपणे सांगितले.

या निषेध आंदोलनवेळी फलटण तालुका सहसंपर्क प्रमुख संभाजी जगताप, शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे व विकास नाळे, शहरप्रमुख निखिल पवार, महिला शहरप्रमुख लताताई तावरे, उपतालुका प्रमुख अभिजीत कदम व नानासाहेब भोईटे, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख विश्वास चव्हाण, ग्राहक संरक्षण कक्षाचे माजी जिल्हाप्रमुख शैलेश नलवडे, उपजिल्हा प्रमुख भारतशेठ लोहाना, तालुका प्रमुख चंद्रकांत सुर्यवंशी, माथाडी कामगार तालुका प्रमुख नंदकुमार काकडे, उपशहर प्रमुख राहुल पवार, विभाग प्रमुख तानाजी बर्गे व महेंद्र घाडगे, उपविभाग प्रमुख कुमार भोसले, मनोज गोसावी, शाखाप्रमुख शेखर सावंत, अक्षय तावरे, मंगेश खंदारे, रामदास यादव, जितेंद्र घाडगे व प्रशांत निंबाळकर, प्रकाश सुर्यवंशी, दत्तात्रय बनकर, ज्ञानेश्वर मुळीक, संतोष शिंदे, मोहन गोसावी आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!