काबुल विद्यापीठावर दहशतवादी हल्ल्यात १० जणांचा मृत्यू


 

स्थैर्य, काबुल, दि.२: अफगाणिस्तानमधील
काबुल विद्यापीठावर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून हल्ल्यात जवळपास १०
जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दहशतवाद्यांनी
विद्यार्थ्यांना लक्ष्य करुन त्यांच्यावर गोळीबार केला, या हल्ल्यात ४० जण
जखमी झाल्याचेही समजते. दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी
दाखल झाले असून चकमक सुरू असल्याचे वृत्त आहे.

विद्यापीठ परिसरात घुसलेल्या
दहशतववाद्यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळीबाराचा
आवाज ऐकून परिसरात खळबळ माजली. गोळीबारानंतर अनेकांनी पर्यायी मार्ग अवलंबत
सुरक्षित स्थळी दाखल झाले. मात्र, विद्यार्थ्यांना पाहताच त्यांनी गोळीबार
सुरू केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या हल्ल्यापाठिमागे आपला हात
नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. तसेच, अद्याप कोणत्याच संघटनेने या
हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!