पुण्यात भीषण अपघात; ट्रकने दहा ते बारा वाहनांना चिरडले


 

स्थैर्य, पुणे, दि. ०६ : कात्रज – देहुरोड रोडवरील नर्हे आंबेगावच्या पेट्रोल पंपासमोर मंगळवारी ( दि. ६) सकाळी साडे दहाच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. ऑर्किड स्कूलच्या समोर हा अपघात घडला. मालट्रकची धडक इतकी भीषण होती की समोरील एक पिकअप टेम्पो थेट बाजूच्या चारीत कोसळून पडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी साडेदहाच्या दरम्यान कात्रज कडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एका मालट्रक चालकाचे नियंत्रण सुटून त्याने पुढील आठ ते नऊ वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पुढील वाहने एकमेकांना धडकत गेली. या विचित्र अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाचव्यक्ती जखमी आहेत. झालेल्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत . या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली. वाहने रस्त्यावर असल्याने एका बाजूचा रस्ता पूर्ण बंद करण्यात आला आहे, त्यामुळे संपूर्ण वाहतुकीचा ताण हा एका बाजूवर येऊन मुंगीच्या गतीने वाहने पुढे सरकत आहेत. क्रेनच्या सहाय्याने मालट्रक आणि अपघातग्रस्त वाहने उचलण्यास सुरुवात झाली असून याबाबत अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!