दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२२ । फलटण । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस (इयत्ता १० वी) फलटण तालुक्यातील ११ परीक्षा केंद्राद्वारे ४ हजार २८० विद्यार्थी/विद्यार्थिनी परीक्षेस बसणार असून उद्या मंगळवार दि. १५ मार्च पासून सुरु होत असलेल्या या परीक्षेसाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती फलटण पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी तथा या परीक्षेचे परीरक्षक (कस्टोडीयन) सी. जी. मठपती यांनी दिली आहे.
फलटण शहरात इयत्ता १० वी ची ३ आणि ग्रामीण भागात ८ परीक्षा केंद्र असून तेथील केंद्र संचलकांमार्फत बैठक व्यवस्थेसह अन्य संपूर्ण व्यवस्था पूर्ण झाली असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा या परीक्षेचे परीरक्षक (कस्टोडीयन) सी. जी. मठपती यांनी दिली आहे.
फलटण शहरात मुधोजी हायस्कुल केंद्रावर ८९०, यशवंतराव चव्हाण हायस्कुल केंद्रावर ४५५ आणि मालोजीराजे शेती विद्यालय केंद्रावर २२१ असे शहरातील ३ केंद्रावर १५६६ विद्यार्थी/विद्यार्थिनी परीक्षेस बसणार आहेत तर ग्रामीण भागातील ८ केंद्रावर २७१४ विद्यार्थी परीक्षेस बसणार असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा परीरक्षक (कस्टोडीयन) सी. जी. मठपती यांनी सांगितले आहे.
ग्रामीण भागातील ज्योतिर्लिंग हायस्कुल पवारवाडी केंद्रावर २८७, सरदार वल्लभभाई हायस्कुल साखरवाडी केंद्रावर ४४०, सौ. वेणूताई चव्हाण हायस्कुल तरडगाव केंद्रावर २९५, जानाई हायस्कुल राजाळे केंद्रावर ३२६, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कुल जाधववाडी केंद्रावर ४६२, ज्यभवानी हायस्कुल तिरकवाडी केंद्रावर ३०५, न्यू इंग्लिश स्कूल आदरकी बु|| केंद्रावर २६६ आणि उत्तरेश्वर हायस्कुल विडणी केंद्रावर ३३३ विद्यार्थी/विद्यार्थिनी परीक्षेस बसणार असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा या परीक्षेचे परीरक्षक (कस्टोडीयन) सी. जी. मठपती यांनी सांगितले आहे.
दरम्यान इयत्ता १२ वी परीक्षा फलटण शहरातील ५ परीक्षा केंद्रावर दि. ४ मार्च पासून शांततेत व सुरळीत सुरु आहेत, ३६६४ विद्यार्थी/विद्यार्थिनी या परीक्षेस बसले असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा या परीक्षेचे परीरक्षक (कस्टोडीयन) सी. जी. मठपती यांनी सांगितले आहे.