दैनिक स्थैर्य । दि. २७ मे २०२२ । सातारा । वडीलोपार्जीत शेतातील जमीन कसण्यासाठी जाताना वाट अडविली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चिखली ता. सातारा येथील दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारुती कृष्णा जाधव,यशोदा मारुती जाधव, काशीनाथ कृष्णा जाधव, कलाबाई काशीनाथ जाधव, लक्ष्मण कृष्णा जाधव, कल्पना लक्ष्मण जाधव, यशवंत कृष्णा जाधव, बबाबाई यशवंत जाधव, तानाबाई कोंडिबा जाधव, दीपक यशवंत जाधव सर्व रा. चिखली, ता. सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विठोबा रामचंद्र शिर्के वय ६६, रा. चिखली, ता. सातारा यांची गावात वडिलोपार्जित जमीन आहे. ही जमीन कसण्यासाठी जात असताना गावातील वरील संशयितांनी त्यांना ट्रॅक्टर व बैलगाडी घेऊन जाण्यास रोखले.