शेटफळे गावचे सुपुत्र उपसरपंच श्री विजय देवकर यांनी घेतल्या दहा मुली दत्तक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२२ । शेटफळे । जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. 2 शेटफळे येथील दहा गरजू व होतकरू मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या सर्व शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलण्याचे सामाजिक कार्य शेटफळे येथील ग्रामपंचायतचे तरुण व तडफदार उपसरपंच श्री विजय देवकर यांनी केले आहे. गदिमा स्मारकामध्ये गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार व दत्तक घेतलेल्या मुलींना शैक्षणिक साहित्य वाटपाचा संयुक्त कार्यक्रम आटपाडी तालुक्याच्या कर्तव्यदक्ष व डॅशिंग तहसीलदार बाई माने मॅडम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी मध्ये जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या शेटफळे नंबर दोन शाळेतील विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. व गावातील तरुण व तडफदार उपसरपंच श्री विजय देवकर सर यांनी दत्तक घेतलेल्या दहा मुलींना तसेच पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या पवन मंडले या वडिलांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना तहसीलदार बाई माने मॅडम यांनी विजय देवकर सरांनी विद्यार्थिनींना दत्तक घेतलेल्या कार्याची प्रशंसा करून आदर्शवत काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. समाजामध्ये दानशूर व्यक्तींनी अशा कार्यात सामील होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शेटफळ केंद्राच्या केंद्रप्रमुख मैनाताई गायकवाड मॅडम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा पाटील मॅडम यांनी श्री विजय देवकर यांचे कायमस्वरूपी शाळेला सहकार्य असल्याचे मनोगतातून व्यक्त केले व असेच सहकार्य कायमस्वरूपी मिळावे अशी सद्भावना व्यक्त केली. शाळेतील शिक्षक जयवंत बंडगर सर यांनी देवकर सरांनी गेल्या पाच वर्षापासून दरवर्षी मुली दत्तक घेतल्याचे सांगितले व त्यांचे कार्य आदर्शवत असल्याचे मनोगतातून व्यक्त केले. सी. पी. गायकवाड सरांनी विजय देवकर म्हणजे गावाला लाभलेले एक रत्नच आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्या व कोणत्याही कामात हिरीरीने भाग घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे विजय देवकर असे त्यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सी .पी .गायकवाड सर, ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष अण्णा गायकवाड, शेटफळे केंद्राच्या केंद्रप्रमुख मैनाताई गायकवाड मॅडम, तलाठी माळी साहेब ,ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती गायकवाड, ज्ञानेश्वर वाघमारे ,महेंद्र भोरे ,पोलीस पाटील दत्तात्रय क्षीरसागर, विलास गायकवाड ,आकाश मोकाशी, भारत माने, दिनकर गायकवाड, रावसाहेब गायकवाड, रंजीत गायकवाड ,लक्ष्मण गायकवाड ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड व उपाध्यक्ष मारुती गायकवाड ,हणमंत काळे, बापूराव गायकवाड, भागवत गायकवाड, निलेश गायकवाड ,मारुती कोळेकर ,बाळासाहेब मदने, मुस्ताक मुलाणी ,महेश गायकवाड प्रमोद गायकवाड ,रंजीत मंडले तसेच शाळा नंबर 2 शेटफळेमधील सर्व शिक्षक स्टाफ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 2 शेटफळेच्या सर्व विद्यार्थिनी व गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान माने सर यांनी केले व आभार सागर नागणे सर यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!