अनुकंपा तत्वाखालील गट-ड संवर्गातील उमेदवारांची तात्पुरती जिल्हा सामायिक प्रतिक्षासूची प्रसिध्द

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । सातारा । जिल्हाधिकारी  कार्यालय, सातारा  यांच्यामार्फत अनुकंपा तत्वाखालील उमेदवारांची गट-ड सवंर्गाची तात्पुरती जिल्हा सामायिक प्रतिक्षासूची जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या नोटिस बोर्डवर तसेच www.satara.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या यादीवर कोणत्याही  प्रकारची हरकत असल्यास संबंधित कार्यालयाने, उमेदवाराने व व्यक्तीने समक्ष पुराव्याच्या कागदपत्राच्या आधारे संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित कार्यालयाने शासन आदेशातील तरतुदीनुसार पुराव्याच्या कागदपत्रांची पडताळणी / खात्री करुनच स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सदर निवेदन प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा (आस्थापना शाखा) येथे संपर्क साधावा. वैयक्तिकरित्या कोणीही या कार्यालयाशी संपर्क साधू नये. संबंधित हरकत, कार्यालयाचे अभिप्राय शासन आदेशानुसार योग्य असल्यास त्याप्रमाणे अनुकंपा तत्वाखाली उमेदवारांची गट-ड संवर्गाची तात्पुरती जिल्हा सामायिक प्रतिक्षासूचीमध्ये योग्य ती दुरुस्ती करुन अंतिम प्रतिक्षासूची प्रसिध्द केली जाईल. मुदतीनंतर येणाऱ्या हरकतींचा व कार्यालयांच्या अभिप्रायांचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घेण्यात यावी असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!