जिल्हा बँक निवडणुकीदिवशी दहिवडी शहरातील वाहतुकीमध्ये तात्पुरता बदल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२० नोव्हेंबर २०२१ । दहिवडी । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक 2021 सातारा जिल्ह्यात एकूण अकरा केंद्रावरती पार पडणार आहे. मतदान दिनांक 21/11/21 रोजी माण तालुक्यातील दहिवडी मधील महात्मा गांधी विद्यालय व जुनिअर कॉलेज दहिवडी या ठिकाणी पार पडणार आहे. सदर परिसरातील वाहन धारक आणि पादचारी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तसेच वाहतूक सुरक्षित व सुरळीत होणे करीता दहिवडी शहरामधून म्हसवड च्या दिशेने जाणारा रस्ता पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे.

दहिवडी शहरातील महात्मा गांधी विद्यालय वर जुनिअर कॉलेज दहिवडी या समोरून जाणार रस्ता हा मुख्य रस्ता आहे. सर्व प्रकारची हलकी वर अवजड वाहतूक याच रस्त्यावरून होत असते मात्र सोमवार दिनांक 21/11/21 रोजी याच रस्त्याला लागून असणाऱ्या मतदान केंद्रावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मतदान पार पडणार आहे. त्या दिवशी या रस्त्यावर वाहतुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या आदेशानुसार हा रस्ता वाहतुकीसाठी मतदान संपेपर्यत बंद करण्यात आला आहे. दहिवडी वरून म्हसवड जानेकारिता पर्यायी रस्ता हा एस टी स्टॅन्ड च्या पाठीमागून (दक्षिणेकडून )सिद्धनाथ मंगलकार्यालयाच्या बाजूने पिंगली हद्दीतील खांडसरी ते गोंदवले मार्गे म्हसवड असा वळविण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!